महात्मा फुलेंचे शिक्षणाच्या विचारांचा अवलंब करण्याची गरज :भानुदास माळी

कराड : विद्या मोरे
आजच्या धावते युगामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळेच आज प्रत्येकाने क्रांतीबा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणाचे विचार अवलंब करण्याची गरज आहे असे मत राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले.पाडळी (केसे) तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने कराड येथील आदर्शमाता प्रतिष्ठानच्या कार्यालयात क्रांतीबा,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचे 134 वी पुण्यतिथी च्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चे संस्थापक विश्वास मोहिते म्हणाले, कोणतेही महापुरुषांना जातीच्या कोंडवाड्यात कोंडू नये, महापुरुषांचे कार्य महान आहेत म्हणूनच त्यांना आपण महापुरुष म्हणतो, महापुरुषांची विचार प्रत्येकाने आत्मसात करून त्याचा प्रसार केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी केल्याचे समाधान लाभेल,

कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीबा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी भानुदास माळी, कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, एडवोकेट हरीश काळे , सोनाईचीवाडी ग्रामपंचायत सदस्या सौ.उषाताई आनंदराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक एडवोकेट समीर मुल्ला यांनी केले. तर आभार प्रतिष्ठानचे राज्य उपाध्यक्ष संपतराव मोहिते यांनी मानले. कार्यक्रमास पाडळी केसे ग्रामपंचायत सदस्य आनंदराव बडेकर, सौ निशा मोरे, सुमन जगदाळे, राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय तडाके, आदर्श माता प्रतिष्ठानचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दीपक मोहिते, अनिल बडेकर, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अमोल वीर सहकार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button