अज्ञात महिलेकडून बोगस खरेदीखत नोंदणी,पोलिस कार्यवाही संशयास्पद

आबा सूर्यवंशी
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी)

पाचोरा – अज्ञात महिले महीलेने नावात साम्य असल्याचा फायदा घेत बनवत कागदपत्रांच्या आधारे पाचोरा येथील दुय्यम निबंध कार्यालयात दुसऱ्याच्या मालकीचा बिनशेती प्लॉट खरेदीखत करून दिल्या चां प्रकार घडला आहे. सदर प्रकरण समजल्या नंतर दुय्यम निबंध पाचोरा यांनी ती महिला आणि दोन साक्षीदारांवर पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे .या फसवणूक प्रकरणातील दोन्ही साक्षीदार अटकेत असून महिलेचा पोलिस शोध घेत आहेत. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी एक ते दीडच्या सुमारास एक अज्ञात महिलेले जळगाव येथील गट नंबर १३४ चा दोन मधील प्लॉट नंबर ९ क्षेत्रफळ १८० चौरस मीटर हा शितल सुनील कुमार पाटील यांच्या मालकीचा प्लॉट महिलेने नावात साम्य असल्याचे भासवून आधार कार्डवर छेडछाड करीत फोटो लावून दुय्यम निबंधक यांची दिशाभूल करून दस्त नंबर ६९५७ या क्रमांकावर बखळ प्लॉटची खरेदी खताचा दस्तऐवज नोंद केला होता. सदर बनावट खरेदी प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्लॉट चे मूळ मालक शीतल सुनीलकुमार पाटील यांनी दि २२ आक्टोबर २०२० रोजी दस्त न ३९१६चे खरेदी खताचा दस्ताऐवज नोंदवून जारगाव येथील गट नंबर १३४/२ मधील प्लॉट नं. ९ चे क्षेत्र १८० चौ. मी. हा प्लॉट घेतलेला होता. प्लॉटचे मूळ मालक सुनिलकुमार यांना प्रकार समजला असता त्यांनी बनावट नोंदणी झालेला खरेदी खताचा दस्त रद्द करण्यासाठी अर्ज केला. त्याच वेळी लक्षात आले की बनावट महिलेने प्लॉट माझाच असल्याचे भासवून नोंदणी करून ठरलेली रक्कम घेऊन बेपत्ता झाली आहे.
*पोलीस कार्यवाही संशयास्पद?*
या प्रकरणातील ज्या व्यक्तिला प्लाॅट विकला त्या नगराज अहिरे यांनी ही बाब दुय्यम निबंधक व पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणुन दिली होती. तशी लेखी तक्रारही त्यांनी दोघी विभागाकडे केली.माञ दोन्ही विभागाच्या अधिकार्‍यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. कोणताही खरेदी विक्री व्यवहार करतांना संबधित जागेच्या मागिल व्यवहाराची कागदपञे तपासणी करणे हे स्टॅम्प वेंडर, संगणक कर्मचारी व दुय्यम निबंधक यांची जबाबदारी होती.माञ या सर्वांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला.यात मुख्य आरोपी हे दुय्यम निबंधकच होणे अपेक्षित असतांना पोलीस प्रशासनाने त्यांना फिर्यादी करून या प्रकरणात वाचवण्याचा प्रकार केला असुन ज्याची फसगत झालीते नगराज अहिरे यांचा गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करीत असलेल्या पोलीस प्रशासनाच्या कार्यवाही वर संशय आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Related Articles

Back to top button