पाचोरा महाविद्यालयाच्या ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरा’चे खडकदेवळा खुर्द येथे उत्साहात उद्घाटन
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)-
पाचोरा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीरा चा उद्घाटन सोहळा खडकदेवळा खुर्द येथे उत्साहात संपन्न झाला.
या शिबिराचे उद्घाटन खडकदेवळा खुर्दचे माजी सरपंच सुदाम वाघ यांच्या हस्ते पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराला गावाच्या वतीने पूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले. या शिबिराच्या सात दिवसांमध्ये गावात समाजोपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवले जातील अशी आशाही व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होय. स्वयंसेवकांच्या कलागुणांना वाव देणारे विचारपीठ हे विशेष हिवाळी शिबीर होय. हे शिबिरे देशाचा सुजाण नागरिक घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असे त्यांनी स्पष्ट केले. रासेयोचे जिल्हा समन्वय डॉ. दिनेश पाटील यांनीही स्वयंसेवकांना सात दिवसाच्या निवासी शिबिराची जाणीव करून देत स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तींने कोणते कार्य केले पाहिजे याच्या संदर्भात माहिती दिली. गावपातळीवरच्या शिबिरातूनच स्वयंसेवक राष्ट्रीय स्तरावरच्या शिबिरात पुढे जातात हे देखील त्यांनी मत व्यक्त केले. गावाचे पोलीस पाटील तुकाराम तेली यांनी गावामध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जाऊ शकतात व तेथील अडचणींच्या संदर्भात विचार मांडले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, पारोळा विभागीय समन्वयक डॉ. वाय. बी. पुरी, IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. बी. वळवी, रामचंद्र शेलार, मुख्याध्यापक रवींद्र शिंदे, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, प्रा. वैशाली कोरडे, प्रा. सुनील पाटील, विजय सोनजे, प्राध्यापक, शिक्षक, गावातील नागरिक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक- स्वयंसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील भोसले, प्रास्ताविक प्रा. आर. बी. वळवी तर आभार डॉ. क्रांती सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक- स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.