केदार हायस्कूल सुकणे व तारांगण इंग्लिश मीडियम स्कूल विंग माध्यमिक विभाग या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहिले
कराड विद्या मोरे.
त्यांना कराड पोलीस ठाणे येथे सकाळी ११:०० ते 14.00 या वेळेत रेंजिंग डे सप्ताहा निमित्त माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सो, सातारा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडू कर सो सातारा व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर सो कराड व विभाग कराड यांचे मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी माननीय पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप सो यांनी समाजात वाढणारी बालगुन्हेगारी, सोशल मीडियाचा दुष्परिणाम, सायबर क्राईम, फसवणूक , बालक व स्त्रियांवर होणारे वाढते अत्याचार, मोबाईल गेमिंग, अल्पवयीन वयातील रिलेशनशिप यांचा वास्तविक जीवनात मुलांवर होणारा दुष्परिणाम आणि या दुष्परिणाम पासून विद्यार्थ्यांनी सावधानता कशी बाळगावी यासाठी महत्त्वपूर्ण वैचारिक मार्गदर्शन केले.
तसेच ठाणे अमलदार श्री. अर्जुन पाचुपते, हेड कॉन्स्टेबल श्री. धनंजय कोळी, महिला हेड कॉन्स्टेबल हसीना मुजावर, पोलीस हवालदार श्री प्रशांत जाधव पोलीस हवालदार श्री तानाजी बागल, पोलीस कॉन्स्टेबल आशिष पाटील अनिल चव्हाण महिला पोलीस कॉन्स्टेबल स्मिता जाधव पूजा पाटील यांनी first table , कॉम्पुटर lab , गंभीर गुन्हे गोपनीय कक्ष ,गुन्हे प्रकटीकरण ,आवक जावक बारनिशी ,गार्डरूम, lockup ,लेखनीय केंद्र ,गुन्हे वाचक कक्ष ,गुन्हे अभिलेख कक्ष,मुद्देमाल कक्ष, दप्तरी कक्ष,हजेरी मेजर कक्ष,,वाचक कक्ष,रायफल प्रकार,gas gun ,पिस्तुल,हातकडी,(बेडी),लाठी ,हेल्मेट या प्रत्येक विभागाची माहिती संबंधित अधिकार्यांनी विध्यार्थ्यांना अत्यंत चांगली सांगितली. पोलीस स्टेशनमध्ये बालकांना उपरोक्त माहिती दिल्याने शिक्षक वर्ग यांनी माननीय पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप व इतर पोलीस अंमलदार सर्वांचे आभार मानले व विद्यार्थी त्यांचे भवितव्यावर नक्कीच याचा चांगला सकारात्मक परिणाम होईल असे सांगितले