कराड महाराष्ट्र:इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमकडून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने “साऊथ इंडियन लूक फॅशन शो स्पर्धा”अतिशय उत्साहात संपन्न
रिपोर्ट:विशेष संवाददाता श्रीमती विद्या मोरे
कराड महाराष्ट्र:जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमकडून “साऊथ इंडियन लूक फॅशन शो स्पर्धा” शनिवार दिनांक ०४ मार्च २०२३ रोजी वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे आयोजन करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. वैशाली मोहिते – प्राचार्या कृष्णा नर्सिंग कॉलेज, कराड या उपस्थित होत्या. या स्पर्धेमध्ये मीरा शहा यांना प्रथम क्रमांक, मधुरा राऊत यांना द्वितीय क्रमांक, आशा सावंत यांना तृतीय क्रमांक तर आस्मा इनामदार व अभिरुची कळसे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. याशिवाय बेस्ट ज्वेलरीसाठी सूचिता कुरेकर, बेस्ट कॉन्फिडन्ससाठी प्रतिभा लखापती, बेस्ट साडी ड्रेपिंगसाठी हेतल चावडीमनी तर बेस्ट कॅटवॉकसाठी मेघा सूर्यवंशी यांना विशेष बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रज्ञा शेट्टी आणि वसुधा वस्त यांनी काम पाहिले. सर्व स्पर्धकांना तनिष फॉर्मिंग ज्वेलरी कराड यांचेकडून आकर्षक भेटवस्तूंचे कूपन भेट म्हणून देण्यात आले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमकडून प्रतिवर्षी दिला जाणारा ” आदर्श माता पुरस्कार ” पवित्रा फरांदे यांना देण्यात आला. तसेच “प्राऊड ऑफ इनरव्हील अवॉर्ड” इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ हिल्सच्या पास्ट प्रेसिडेंट स्वाती जगताप यांना देण्यात आला. कराड शहर व परीसरातील महिलांबरोबरच महाराष्ट्रातील विविध भागातील अनेक महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन व उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लब सदस्या तरुणा मोहिरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सेक्रेटरी संगीत पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून तनिष फॉर्मिंग ज्वेलरी कराड, सारिका शहा (श्री खाकरा) , पुष्पा चौधरी ( मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान, राजमाची-कराड ) श्वेता मोहिरे ( तुकाराम केशव मोहिरे भांडी दुकान ) आणि माजी नगरसेविका विद्या पावसकर यांनी सहकार्य केले. इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या वतीने श्रुती जोशी यांनी प्रोजेक्ट चेअरमन तर अंजना माने यांनी को- चअरमन म्हणून काम पाहिले.या कार्यक्रमप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या प्रेसिडेंट विजयश्री मोहिते, सेक्रेटरी संगीता पाटील, व्हॉइस प्रेसिडेंट छाया पवार, आय.पी.पी. माहेश्वरी जाधव, एडिटर अश्विनी कोळी, सी.सी. दीपाली लोहार यांच्याशिवाय अलका शिंदे , वृषाली पाटणकर, सोनाली पाटील, स्वाती मोहिते, जया सचदेव, मुस्कान तलरेजा, रतन शिंदे, शिवांजली पाटील, स्वाती देवकर , स्नेहांकी आवळकर, नंदा आवळकर, डॉ. प्रतिभा कणसे, अपूर्वा पाटणकर, सुकेशिनी कांबळे, सुप्रिया पाटील, इत्यादी सर्व क्लब सदस्य उपस्थित होते.