निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन संपन्न

आबा सूर्यवंशी
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोराव तात्यासाहेब आर.ओ. पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न झाले. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती. मुख्य अतिथी व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व सरस्वतीच्या प्रतिमेस मार्ल्यापण करून गणेश वंदनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. राजस्थानी, पंजाबी, हिंदी, मराठी भाषेच्या गीतांवर लहान चिमुरड्यांच्या नृत्याविष्कारांनी मने जिंकली. मोबाईल, सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे समाजात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या बाबत जनजागृती करण्यासाठी लहान चिमुकल्यांनी आपल्या नृत्यातून प्रभावी संदेश देत त्याचे शारीरिक, मानसिक परिणामां सोबतच कुटुंबातील नातेसंबंध किती कमकुवत होत आहेत यावर उपस्थितांना विचार करावयास भाग पाडले व मनोरंजनातून समाज प्रबोधन देखील केले.
शाळेच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले आणि या प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त ,आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता विकसित होतात व त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असे सांगितले.पालकांनी आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. कौटुंबिक संवाद जास्त असेल तर ते आपोआपच मोबाईल व सोशल मीडिया पासून दूर राहतील असे आपले मत व्यक्त केले.
या प्रसंगी शाळेच्या उपाध्यक्षा श्रीमती. कमलताई पाटील, जनसंपर्क अधिकारी श्री आय. बी. सिंग, शाळेचे प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख सौ. वर्षा पाटील व फरीदा भारमल यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button