Karad:मलकापूर येथे सुवर्णमहोत्सवी महिला मेळावा जल्लोषात साजरा…जरीना तांबोळी ठरल्या एक ग्रॅम सोन्याचे नाणे व मानाच्या पैठणीच्या मानकरी….

रिपोर्ट:विद्या मोरे कराड
मलकापूर — श्री मळाई महिला विकास मंच आयोजित व कृष्णकमल ज्वेलर्स कराड ,गांधी ज्वेलर्स कराड , कालिका साडी सेंटर मलकापूर पुरस्कृत सुवर्णमहोत्सवी महिला मेळावा गुरुवार दि.9 मार्च 2023 रोजी आदर्श ज्युनिअर कॉलेज येथे जल्लोषात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई अशोकराव थोरात प्रमुख पाहुणे मा.धीरज गांधी, स्वाती पवार,सौ.शितल तवटे यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा देशपांडे, शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ, सौ.तेजस्विनी शहा,लायन्स नक्षत्र क्लबच्या अध्यक्षा सौ.विद्या मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी प्रमुख पाहुणे सौ.स्वाती पवार, श्री . सुरज गांधी,सौ.शितल तवटे यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करीत आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर असून महिला आज अबला नसून सबला आहे हे अधोरेखित झाले आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी श्री मळाई महिला विकास मंचच्या उपक्रमांचे कौतुक करीत महिलांना सन्मान मिळावा, त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी महिला विकास मंच माध्यमातून होणाऱ्या प्रयत्नांबद्दल गौरवोदगार काढले.
यावेळी श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्यक्षा डॉ.स्वाती थोरात यांनी मळाई महिला विकास मंचच्या माध्यमातून होणारा हा मेळावा सुवर्णमहोत्सवी मेळावा असून या निमित्ताने मागील सर्व मेळाव्यांचा आढावा घेत आजपर्यंत राबवलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली तसेच महिलांनी आपले कर्तृत्व, वक्तृत्व व नेतृत्व या गुणांच्या आधारे सर्व क्षेत्रे काबीज करावीत असा संदेश दिला.
सुवर्णमहोत्सवी मेळाव्याच्या निमित्ताने खेळ पैठणीचा आनंद सुवर्णसंयोगी क्षणांचा सामना रंगतदार झाला. यामध्ये कापील गोळेश्वरच्या जरीना तांबोळी यांनी प्रथम क्रमांक पटकावून एक ग्रॅम सोन्याचे नाणे व मानाच्या पैठणीचा बहुमान मिळवला.
सदर स्पर्धेचा निकाल गटनिहाय पुढीलप्रमाणे-
खेळ पैठणीचा —
प्रथम क्रमांक -जरीना तांबोळी कापील गोळेश्वर एक ग्रॅम सोन्याचे नाणे व मानाची पैठणी.

द्वितीय क्रमांक- मधुरा माळी 500 मिलिग्रॅम सोन्याची नथ तृतीय क्रमांक- लक्ष्मी इंगळे गोळेेश्वर )चांदीचे पैंजण सर्व विजेत्यांना सदर बक्षिसे कृष्णकमल ज्वेलर्स यांचे वतीने देण्यात आली.
तसेच विशाखा पवार, सौ.रूपाली कांबळे, रेश्मा सातपुते,वैशाली जाधव, सौ.प्रियांका गुरव, प्रियांका डाईगडे यांनी अनुक्रमे चतुर्थ ते नववा क्रमांक संपादन केला त्यांना श्री मळाई नागरी सहकारी पतसंस्था व कालिका साडी सेंटर यांच्यावतीने आकर्षक काठपदर साडी बक्षिस देऊन गौरवण्यात आले.
लकी ड्रॉ-कुमारिका गटातून मयुरी सांगळे, ज्येष्ठ महिला गटातून अलका दरेकर, गृहमदतनिस गटातून रेश्मा माने, व्यावसायिक गटातून शितल हिंगसे, नोकरदार गटातून प्रियांका चव्हाण,गृहिणी गटातून सौ.कविता मेहेर,सौ.पुनम जेजुरीकर या सर्व लकी ड्रॉ विजेत्यांना श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आकर्षक काठपदर साडी देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच यावेळी घेण्यात आलेल्या स्पॉट गेम्स साठी 100 बक्षिसे श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वतीने विजेत्यांना देण्यात आली.
सदर स्पर्धेतील खेळ पैठणीचा आनंद सुवर्णसंयोगी क्षणांचा स्पर्धेसाठी प्रथम तीन क्रमांकाची बक्षिसे कृष्णकमल ज्वेलर्स यांचेवतीने,चतुर्थ ते नवव्या क्रमांकाची तसेच लकी ड्रॉ मधील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक काठपदर साडी कालिका साडी सेंटर व श्री मळाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात आली. तर मेळाव्यासाठी उपस्थित सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू मा. धीरज गांधी यांच्या वतीने देण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी श्री मळाई शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, श्री मळाई नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, शाखाधिकारी, मा.सौ.उर्वी गांधी, मा.वैशाली मोहिते, दैनिक पुढारीच्या उपसंपादक प्रतिभा राजे,मा.यशोदा जाधव, मा.शारदा पवार, डॉ.राजमाने मॅडम,डॉ.वाठारकर मॅडम, डॉ.हेमा पाटील, श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षिका स्टाफ, तसेच मलकापूर पंचक्रोशीतील महिला व युवती यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी श्रीमळाई महिला विकास मंचच्या सर्व महिला सदस्यांनी स्वागत गीत सादर केले त्याला संगीत शिक्षक शरद तांबवेकर व बाल वाद्यवृंद यांनी साथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुरेखा खंडागळे व सौ. तेजस्विनी शहा यांनी केले तर आभार श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सौ. अरुणादेवी पाटील यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मळाई महिला विकास मंचच्या सर्व सदस्या, राजेंद्र पांढरपट्टे सर , सर्व शाखांमधील कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button