सारोळा शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर !* वनविभागाने बिबट्या लवकर जेरबंद करावा शेतकऱ्यांची मागणी
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)-
पाचोरा शहरा जवळ असलेल्या सारोळा बुद्रुक शिवारात दुपारच्या सुमारास एका शेतात शेतकऱ्याला बिबट्या सदृश प्राणी झोपलेला आढळून आल्याने शेतकऱ्यांची पळापळ झाली. या प्रकाराची माहिती वन अधिकारी यांना कळविली असता वन अधिकाऱ्याने शिवारात येऊन पाहणी केली असून सदर प्राणी आढळून आल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे. तर शेतकऱ्यांनी बिबट्याला लवकर जेरबंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे.शहरालगत असलेल्या सारोळा शिवार येतो या परीसरात किरण भदाणे हे शेतकरी आपल्या शेतात मक्याचे शेताला पाणी भरत असतांना त्यांना अचानक बिबट्या सदृश्य प्राणी झोपलेला दिसून आला. शेतकरी भ दाणे यांनी घाबरलेल्या अवस्थेतच बिबट्याचा आपल्या मोबाईलवरच फोटो काढून इतरांना हि बातमी सांगण्यासाठी पळाले असता बिबट्या सदृश्य प्राण्याने शेतातून पोबारा केला. बिबटय़ा असल्याची वार्ता परीसरात पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे अधिकारी श्री .मुलाणे यांना माहिती क्लवितच ते आपल्या पथका सह या शिवारात पोहचले. मात्र शेतात शेतकऱ्यांने पाणी भरणा केल्यामुळे कोणतेही ठसे उमटलेले दिसून आले नाही. या वनविभागाचे प्रमुख आर. एस. मुलाणे यांनी बिबट्या सदृश्य प्राणी फोटो वरुन दिसतो असा अंदाज लावला. शेतकऱ्यांनी घाबरु नये दिसलेल्या बिबट्याने आज पर्यंत कोणावरही हल्ला केलेला नाही.पुन्हा परिसरात असे काही आढळले तर तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा, रब्बी चा हंगाम असल्याने शेतकऱ्यांनी बिनधास्त शेतात काम करण्याचे आवाहन केले आहे.सदर प्राण्याला लवकरच पकडण्यात येणार असल्याचे वन अधिकाऱ्याने सांगितले आहे.