Chalisgaon News:चाळीसगाव तहसीलदार कार्यालयाची होणारी रिक्त इमारत मधील एक कार्यालय पत्रकार संघटनेला मिळावे-सूर्यकांत कदम

 

चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव तहसीलदार कार्यालय नवीन जागेत स्थलांतर होणार असल्याने रिक्त होणाऱ्या कार्यालयामध्ये पत्रकार बांधवांना कार्यालयासाठी अटी शर्तीवर विनामूल्य जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशनचे (ऑल इंडिया पत्रकार संघटना) महाराष्ट्र-गुजरात-गोवा प्रभारी प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत कदम चाळीसगाव यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि 29 मार्च 2023 रोजी हस्ते तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे कि तहसीलदार कार्यालयाची शासकीय इमारत शहरातील शासकीय दूध डेअरी व शासकीय ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटर शेजारी होणार आहे त्याचे बांधकाम सुरु असून लवकरच हे काम पूर्ण होऊन चाळीसगाव तहसीलदार कार्यालय नवीन जागेत स्थलांतर होणार आहे.
तसेच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांसाठी चाळीसगाव शहरात पत्रकार बांधवांना पत्रकार भवन नाही. म्हणून चाळीसगाव तहसीलदार कार्यालय नूतन जागेत स्थलांतर झाल्यावर जुनी इमारत मधील अनेक खोल्या या रिकाम्या असणार आहेत रिक्त झालेली एक कार्यालयाची जागा आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन (ऑल इंडिया पत्रकार संघटना) या पत्रकार संघटनेला पत्रकार बांधवांना कार्यालयासाठी विनामूल्य कायमस्वरूपी अटी शर्तीवर वापरण्यास द्यावी अशी मागणी केली आहे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री सो
मंत्रालय म. रा. मुंबई, उपमुख्यमंत्री सो
मंत्रालय म. रा. मुंबई, महसूल मंत्री सो
मंत्रालय म. रा. मुंबई, जिल्हाधिकारी सो
जळगाव, प्रांतधिकारी सो
चाळीसगाव यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Related Articles

Back to top button