akola news:अंजनगावरोड आकोट येथे मजुर लोकांसाठी लखन इंगळे यांनी केली थंड माठ पाणेरी चालु
रिपोर्ट:मोहम्मद जुनेद
गोरगरीब व सामान्य लोकांनसाठी नेहमी सक्रिय असलेले वंचित बहुजन आघाडी आकोट शहर उपाध्यक्ष आंदोलन कर्ते लखन इंगळे यांनी लोकांच्या सेवेसाठी लोकांची समस्या जाणता अंजनगाव रोडने जास्त प्रमाणात शेती चा भाग आहे मोल मजुर करणारा वर्ग व बाहेर गावी जाणारे लोकं यांची येजा या रोड ने जास्त प्रमाणात राहते उन्हाचे तापमान जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळे अंजनगावरोड आकोट येथे पिण्याच्या पाण्याची थंड नैसर्गिक माठ पाणेरी चालु केली या मुळे भर उन्हात येणारे मजुर वर्ग व प्रवास करणाऱ्या लोकांना वेळेवर थंड नैसर्गिक पाणी मिळेल व त्यांची तहान भागेल या आशेने ही पाणेरीची सुविधा चालु करण्यात आली यामुळे जानायेणारे सर्व मजूर वर्ग या पानेरीची लाभ घेत आहेत