Akola News:श्री बागाजी विद्यालय व श्रीराम कानिष्ठ महाविद्यालय रूईखेड येथे क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांच्या जयंती दिन साजरा….
रिपोर्ट:मोहम्मद जुनेद
अकोला जनपद के अकोट – अकोट तालुक्यातील रूईखेड येथे नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित श्री बागाजी विद्ययालाय व श्रीराम कानिष्ठ महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वप्रथम विद्यालयाची मुख्याध्यापिका छाया पन्नासे मॅडम यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे हारअर्पण करून पूजन करण्यात आले .सदर कार्यक्रमांत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यांच्या कार्याचे महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितले.यावेळी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गानी महात्मा जोतिबा फुले यांना विनम्र अभिवादन केले .सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन विशाल मांडवे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष काळे सर यांनी केले . कार्यक्रमाला संगीता मानकर,किरण मानकर,अनिता मानकर,वनिता सरोदे,मंजुषा साठे,अनिल ओखरे,प्रा.निनाद मानकर,प्रा.रुपेश गायगोले,प्रा.रुपेश खंडारे,शिक्षकेतर कर्मचारी विठ्ठल फाळके, गजानन घुगे,अविनाश सुकोसे व त्याबरोबर विद्यालयातील विद्यार्थी गण कार्यक्रमाला उपस्थित होते.