Akola news:फ्रीडम मराठी शाळा अकोट मध्ये महात्मा ज्योतीबा फुले,जयंती साजरी
रिपोर्ट:मोहम्मद जुनेद
अकोला जिले के आकोट :- स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीडम मराठी शाळा , आकोट येथे महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस कुंकूम तिलक , हारार्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फ्रीडम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे, शाळा समिती अध्यक्ष प्रविण झाडे , फ्रीडम मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका आर.एन.करुले , पर्यवेक्षिका शारदा चांदुरकर तसेच सहाय्यक शिक्षिका , वर्षा चोरोडे , नीता खंडार, मीना अस्वार, मंगल काटोले, अनुराधा कतोरे, रूपाली नाथे तसेच सहाय्यक शिक्षक सचिन वाघोडे, निखिल अनोकार यांच्या सह सर्व शिक्षक आदींची उपस्थिती होती. उपस्थित शिक्षकांमधून शारदा चांदुरकर यांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. निता खंडार यांनी केले,तर प्रास्ताविक सचिन वाघोडे यांनी केले.आणि कार्यकर्मा चा शेवटचा टप्पा म्हणजे आभारप्रदर्शन अनुराधा कतोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षकांनी तसेच मदनीस ताई यांनी सहकार्य केल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे .