Akola news:फ्रीडम इंग्लिश हायस्कूल आकोट मध्ये जागतिक योगा दिन साजरा
महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
आकोट – स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीडम इंग्लिश हायस्कूल, आकोट मध्ये अंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष फ्रीडम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. अरुणा एस. ताले, तर प्रमुख अतिथी फ्रीडम संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे , पर्यवेक्षक विजय रेवस्कार, सहाय्यक शिक्षक, शिक्षिका यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेला कुंकूम तिलक , हारार्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मार्गदर्शन केले . फ्रीडम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. ए. एस. टाले मॅडम यांनी प्रस्ताविकातून शिक्षकांना योगाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर क्रीडा शिक्षक विक्रांत चंदनशिव यांनी योगासने सादर केले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी क्रीडा शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी अकोटकर तर आभार प्रदर्शन निखिल अनोकार यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीव विद्यार्थी उपस्थित होते.