कर्तव्यदक्ष ट्राफिक महिला कॉन्स्टेबल मा.सोनम पाटील यांचे मानव कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य NGO कडून अभिनंदन करण्यात आले
विद्या मोरे कराड
कराड शहर ट्राफिकच्या महिला कॉन्स्टेबल सोनम पाटील ह्या कर्तव्यात कसूर न करता नेमून दिलेल्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या कठोर कामगिरीमुळे त्यांनी ट्राफिक मध्ये कायद्याचा धाक निर्माण केला आहे.रस्त्यावरून जी टोळके गाडीवरून फिरतात ती त्यांना बघून मार्ग बदलतात. अशा प्रकारे कर्तव्य बजावणाऱ्या सोनम पाटील या अभिनंदनास पात्र आहेत. त्यामुळे मानव कल्याणकारी संघटनेच्या वतीने सोनम पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
त्यावेळी मानव कल्याणकारी संघटनेचे संस्थापक/ राज्य अध्यक्ष मा.सलिम पटेल भैया, राज्य उपाध्यक्ष मा.शशांक नांगरे, राज्य संपर्क प्रमुख मा.जावेदभाई नायकवडी, राज्य कार्यकारीणी सदस्य मा.प्रशांत थोरात, सातारा जिल्हा अध्यक्ष मा.नितीनभाऊ आवळे, जिल्हा कार्याध्यक्ष मा.राजमहम्मद पठाण, जिल्हा संघटक मा.प्रकाश पवार, जिल्हा कार्यकारीणीचे मा.प्रकाश काळे, कराड तालुका अध्यक्ष मा.अयाज शेख, कराड शहर अध्यक्ष मा.समीर बागवान, कराड तालुका संघटक मा.बजरंग कोकाटे, मसुरचे शाखा अध्यक्ष मा.दिलावर मुल्ला, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा मा.लक्ष्मीताई काळे, जिल्हा उपाध्यक्षा मा.अर्चना जाधव, जिल्हा उपाध्यक्षा मा.कुसुमताई शेवाळे, कराड दक्षीण तालुका अध्यक्षा मा.दिपालीताई पुस्तके, कराड उत्तर तालुका अध्यक्षा मा.संगीता दुपटे आणी मा.सिमाताई साळुंखे उपस्थित होते.