आयुष्यात एकदा तरी वारी नक्की करावी- संजय बदियानी, कराड
आज पहिल्यांदाच लोणंद येथे वारीमध्ये जाण्याचा व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील पादुकांचे दर्शन घेण्याचा योग आला.
बंधूमित्र श्री अतुल सामानी यांच्या आग्रहास्तव खरंतर वारीमध्ये जाण्याचा आजचा योग आला.
सकाळी साडेअकरा वाजता लोणंद येथे पोहोचलो. ओळखीच्या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर गाडी पार्क करण्याचे नियोजन होते पण रविवार असल्यामुळे एवढी गर्दी होती की गाडी तीन किलोमीटर अलीकडेच पार्क करावी लागली.आम्ही चालत चालत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी ठेवलेल्या ठिकाणी मार्गस्थ झालो. जाताना वाटेतच कपाळी गंध लावून घेतला.पालखी मुक्कामी असल्यामुळे खूपच गर्दी होती. मी, शिल्पा ,अतुल व आरती गर्दीतून वाट काढत धक्के खात पालखीचे दर्शन घेण्याच्या लाईन पर्यंत पोहोचलो. पालखीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्याकरिता जवळपास दीड तास लागला. दर्शन घेतल्यानंतर पुन्हा बूट घालण्यासाठीची कसरत करून पोटोबाला शांत करण्याचे ठरवले. परतीच्या वाटेवरच कराड येथील राहुल याचा दावणगिरी डोसा स्टॉल दिसला. डोसा खाल्ला पण वारीमध्ये आलो असल्यामुळे राहुल यांनी पैसे घेण्यास नकार दिला. यावरूनच वारकऱ्यांचे महत्त्व काय आहे हे समजून येते. वाटेमध्ये राजगिरा लाडू ,पाणि बॉटल, केळी यांची सेवा लोक देत होते. सेवा देणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधान वेगळेच होते. पुढे गेल्यानंतर नाभिक सेवा देणारे , विदर्भातून आलेले राहुल काका यांच्याशी गप्पा मारल्यावर असे समजले की वारकरी लोणंद येथे पालखीचे दर्शन घेतल्यानंतर दाढी करतात व पुन्हा पंढरपूरला पोहोचल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेऊन परत त्यावेळी दाढी करतात.
यानंतर गंध लावणारे गोसावी समाजातील बीड येथून आलेले श्रीराम हरी यांच्याशी बातचीत केली. गेली तीस वर्षे झाले ते हे कार्य दरवर्षी करत आलेले आहेत. यानंतर थोडी तरतरी यावी म्हणून कृष्णा टी स्टॉल येथील चहा घेण्यासाठी थांबलो. श्री अमोल क्षीरसागर हे हॉटेल चालवतात. लोणंदला मुक्कामी पालखी असल्यानंतर अतिशय चांगला व्यवसाय होतो असे त्यांनी यावेळी नमूद केले.
संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीतील पादुकांचे दर्शन घेण्यासाठीची ओढ व तदनंतर पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची ओढ काय असते हे आजच्या वारीतून समजले.
पुढच्या वर्षी पुन्हा वारीमध्ये यायचे असे मनोमन नक्की करून कराडला जाण्यासाठी निघालो.
आज जवळपास दहा किलोमीटरचे चालणे झाले होते पण म्हणावा तसा थकवा अजिबात जाणवला नाही. बहुदा विठ्ठलाचीच कृपा असावी.