मालवण येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेनिमित्त मराठा समाजाचे आत्मक्लेश आंदोलन
कराड विद्या मोरे: नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट किल्ला येथील काहीच महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली, सदर घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमी यांच्या भावना दुखावल्या असल्याचे चित्र निर्माण झाले असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेचं दुःख,संताप व खेद व्यक्त करण्यासाठी कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी शिवतीर्थ दत्त चौक कराड येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,तसेच यावेळी महाराजांची माफी मागुन शिवरायांचे स्मारकासमोर मुक आत्मक्लेश आं आईदोलन केले.यावेळी तालुक्यातील मराठा सेवक उपस्थित होते,यावेळी कराड शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.