मोहाळा गावात बैल पोळा उत्साहात साजरा
मोहाळा गावात दरवषी प्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. हा सण सर्जा-राजाला समर्पित असून, या सणानिमित्त गावांत सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. पोळ्याच्या सणाला गावातील सर्व जाती-धर्माचे लोक बैलांच्या मिरवणुकीसोबत पोळा भरण्याच्या ठिकाणी एकत्रित होऊन एकमेकांशी भेट घेण्याची परंपरा कायम आहे. सुंदर बैल सजावटी साठी गावात बक्षीस वितरण करण्यात आले बक्षीस बापूराव बोरोडे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी गावाचे सरपंच वंदना पळसपगार उपसरपंच इमरान पटेल ,योगेश वानखडे, अनिल चव्हाण, राजू आवटे, दिपक आवटे, गुलाबराव जूनगरे, मसीरोद्दिन, जावेद पटेल, संतोष बुंदे, सोपान वानखडे, भिमराव वानखडे, राम वानखडे,सुनील गणोरकार, सोपान मुंढे,अमोल जूनगरे,बबन झेंडे, श्रीकृष्ण हरमकार,शरद काचकर,गावातील लोकांची उपस्थिती होती