Akola news:गोपालखेड मार्गे नवीन पुलावरून बसेस सुरू करण्याची परवानगी द्या.मानव समाज संघटनेचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

रिपोर्ट:महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद

प्रतिनिधि/अकोट
दि:26/7/2023

गोपालखेड मार्गावरील नवीन पुलावरून रा. प महामंडळाच्या बसेसना पूल वाहतुकीसाठी योग्य असल्याचे व तसे प्रमाणपत्र देऊन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी,अशा मागणीचे निवेदन आज दि.२५ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोट यांच्या मार्फत कार्यकारी अभियंता अकोला यांना देण्यात आले,

निवेदनकर्त्यांच्या मागणी नुसार अकोट अकोला दर्यापूर मार्गे जाणारा रस्ता घुसर नजीक पुलावर खचल्याने दि.२२ जुलै रोजी वाहतूकिस बंद करण्यात आला होता, त्यामुळे २२ जुलै रोजी अकोट शहराचा अकोल्याशी संपर्क तुटला,अशावेळी
रेल्वे हे एकमेव वाहतुकीचे साधन अकोट शहराला अकोल्याशी जोडून होते,मात्र असे असतांना रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांनची मोठी झुंबड रेल्वे स्थानकावर पहायला मिळाली होती,
यावेळी मोठ्या अडचणीचा सामना करत शहर वासीयांना जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागले होते,
सध्या गोपालखेड मार्गाचे काम पूर्ण झाले आहे,त्यावरून खाजगी प्रवासी वाहने तथा जड वाहतूक देखील बिनदिक्कत सुरू आहे,मात्र असे असतांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ला फक्त प्रमाणपत्राची आडकाठी घालण्यात आली आहे,

खाजगी बसेस गोपालखेड च्या नव्या पुलावरून सुसाट धावताना फक्त एसटी बसेस ला अटकाव का? त्यामुळे संबंधित विभागाने प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर हा मार्ग एसटी बसेस करिता सुरू करावा अशी मागणी निवेदनकर्त्यांकडून करण्यात आली,

निवेदनावर प्रा. विजय भागवतकर सर, प्रशांत मंगळे,सुरेश सेजपाल, विजय जितकर,योगेश तेलगोटे, सुनील वानखडे,रोशन अहेरकर, मतीन शहा, दिलीप सोनोने, प्रतीक संघानी,अँड रतन पळसपगार,अँड.महेश देव, अँड.सागर वसु,अँड. मंगेश सोनोने,अँड.सुनील खंडेराव,अँड.सुबोध पळसपगार,अँड हर्षलता नाथे, अँड.रुचिता ठाकूर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button