कराडमध्ये इनरव्हील महिला महोत्सवाचे आयोजन

 

इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या वतीने कराडमध्ये महिलांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी महिलांचा प्रतिसाद वाढत आहे. महिला या सक्षम आहेत. त्यांच्यामध्ये विविध कला गुण आहेत. त्या कलागुणांना व्यासपीठ मिळावं. त्यांच्यातील कला गुण समाजापुढे सादर व्हावे या उद्देशाने शनिवार दिनांक 28 व रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी हा महोत्सव होत आहे.
कराडमधील वेणूताई चव्हाण सभागृहामध्ये याचे आयोजन केले आहे. शनिवार दि. 28 रोजी पाककला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, स्त्री – सुरक्षा या विषयावर पोस्टर्स स्पर्धा ई .स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये होणार आहेत. दुपारी नववधू मेकअप या विषयावरील फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी रिल्स कॉम्पिटिशनचे सादरीकरण होणार आहे.
रविवार दि. 29 रोजी सकाळी 6 वाजता पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी गो – ग्रीन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा लिबर्टी ग्राउंड येथून सुरू होणार आहे. दुपारी डान्स स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. तसेच या स्पर्धांसाठी आकर्षक बक्षीसही ठेवण्यात आलेली आहेत. या महोत्सवामध्ये ‘प्राऊड ऑफ इनरव्हील’ या पुरस्काराने इनरव्हील पास्ट डिस्ट्रिक्ट चेअरमन इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्पच्या गीता मामनिया यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सौ. शितल जगताप यांना ‘जिजाऊ पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर सौंदर्यसम्राज्ञी, ब्रँड अँबेसिटर, उद्योजिका सौ. स्मिता खामकर या उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा तसेच हा महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थित रहावे व विविध बक्षिसांचा व लकी ड्रॉ बक्षिसांचा लाभ घ्यावा असे आवाहन क्लब प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर व सेक्रेटरी सारिका शहा यांनी केले आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्लबच्या सर्व मेंबर्स परिश्रम घेत आहेत.
स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी

 

कराडहून पियुश गोर यांची रिपोर्ट

Related Articles

Back to top button