अकोला येथील अबुल हसन उर्दू हायस्कूल अकोला, या शाळे चा कक्षा दहावीचा विद्यार्थी मोहम्मद राफे मोहम्मद हनिफ याची विभागीय शालेय तायक्वांदो(taekwondo) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अकोला महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
अकोला क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत २९,३०,३१, ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो (taekwondo )स्पर्धा वसंत देसाई स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती त्या मध्ये अबुल हसन उर्दू हायस्कूल, अकोला, येथील दर वर्षी प्रमाणे इयत्ता 10 वी चा विद्यार्थी मोहम्मद राफे यांने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो (taekwondo)स्पर्धेत तसेच विभाग स्तरावरही सुवर्णपदक पटकावून विभाग स्तरावर आपली चमकदार क्रीडा कामगिरी दाखवली आहे उमेर दानिश एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी चे सचिव मोहम्मद शोएबुर रहमान सर, शाला मुख्याध्यापिका तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सम्मानित करून आगामी स्पर्धा साठी हार्दिक मन :पूर्वक शुभेच्छा वेक्तकेला . मोहम्मद राफे यांना तायक्वांदोचे प्रशिक्षक सय्यद जमील सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.



