Mumbai news:रविवारी समर्थ मित्र मंडळा तर्फे बैलबाजार येथे होमहवन आणि सोमवारी महाप्रसादच्या आयोजन

मुंबई/अजय उपाध्याय
वाडिया इस्टेट 16च्या बाजूला बैलबाजार येथील समर्थ मित्र मंडळ (रजि.)तर्फे कुर्ला (प.)400070 येथे रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होम हवन आणि सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंडळातर्फे सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांची सुरुवात प्रातःस्मरणाने होणार असून त्यानंतर श्री गणेश वंदन, संकल्प, अग्नी स्थापना, नवग्रह आवाहन पूजन, स्थंडीलादी कर्म, नवग्रह हवन, पूर्णाहुती, अग्निर्चन, अभिषेकादी कर्म, ब्राह्मण पूजन, आशीर्वचन, कर्मेश्वरार्पण हे विधी होणार आहेत. तसेच श्रींची आणि माता अंबेची पूजा, नैवेद्य, आरती, मंत्रपुष्प, प्रार्थना झाल्यानंतर रात्री ८वाजता महाप्रसाद होणार आहे.समर्थ मित्र मंडळ तर्फे समस्त भाविकांनी होम हवन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समर्थ मित्र मंडळ अध्यक्ष निलेश (दादा)म्हस्के यांनी केले आहे।



