नवी मुंबईत:संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी दिंडी मिरवणूक* *विद्यार्थी, वारकरी मंडळे, अधिकारी–कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; भजन, नामस्मरण आणि पारंपरिक खेळांनी रंगली माऊलींची शोभायात्रा

The 750th Golden Jubilee of Santshrestha Shri Dnyaneshwar Maharaj will be celebrated in 2025 as per the resolution of the Chief Minister. Former Commissioner of the Metropolitan Municipality Dr. Kailas Shinde Yanchya was very enthusiastic about the birth anniversary celebration of Dnyaneshwar Mauli.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन 2025 हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (750) जयंती वर्ष असून यानिमित्त मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनामार्फत निर्गमित परिपत्रकाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात ज्ञानेश्वर माऊलींचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सजवलेल्या पालखीत ठेवलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून महापालिका मुख्यालयातून दिंडी स्वरूपातील मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. संत ज्ञानेश्वरांच्या वेशभूषेतील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. टाळ-मृदुगांच्या गजरात, लेझिम पथकासह मुख्यालयासमोरील सेवारस्त्याने निघालेल्या दिंडीमध्ये आबालवृध्द नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. विशेषत्वाने ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी – विद्यार्थिनी मुख्याध्यापक श्री.रत्नाकर तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी वेशात लेझीम पथकासह दिंडीत सहभागी होते. युवक, युवतींचाही दिंडीत लक्षणीय सहभाग होता.
‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘जय जय राम कृष्ण हरी’ या नामगजरासह दिंडीत सहभागी ज्ञानाई प्रासादिक भज मंडळ करावे यांचे भजनीबुवा श्री.पंढरीनाथ भोईर, श्री.विजय नाईक, श्री.रविंद्र भोईर तसेच नेरूळचे श्री.अमृतबुवा पाटील या वारकरी बुवांनी तसेच पत्रकार श्री.मनोज जालनावाला यांनी अभंगांचे गायन करीत दिंडीला भावस्वर प्रदान केला.
अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारीही दिंडीमध्ये शुभ्रधवल वारकरी वेश परिधान करून सहभागी झाले होते. सहा.संचालक नगररचना श्री.सोमनाथ केकाण, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, समाजविकास उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम. स्मिता काळे, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, क्रीडा व सांस्कृतिक विभाग उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, सहा. आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारीही दिंडीत सहभागी होते. नवी मुंबईतील विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांचा दिंडीत सहभाग होता. स्वच्छता दिंडीच्या परिधान केलेल्या टोप्या लक्ष वेधून घेत होत्या.
विशेष म्हणजे रस्त्यामध्ये ठिकठिकाणी थांबून तसेच मुख्यालयाच्या प्रांगणात रिंगण घालत फुगड्या, झिम्मा सारखे दिंडीतील खेळही खेळण्यात आले. ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने दिंडीची भावपूर्ण सांगता झाली. त्यानंतर मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये सुप्रसिध्द गायक श्री.मंगेश बोरगांवकर आणि सहका-यांनी सादर केलेल्या भक्तिरंग स्वरयात्रेत सारेजण रंगून गेले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 750 वा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी नवी मुंबईकर उत्साहाने एकत्र आले त्याचा विशेष उल्लेख आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये केला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button