दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी अनुदान वितरणाचा शुभारंभ… सुरेश पाटिल रिपोर्टर भड़गांव महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय २९ फेब्रुवारी घेतला होता

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी अनुदान वितरणाचा शुभारंभ…
सुरेश पाटिल रिपोर्टर भड़गांव महाराष्ट्र
राज्य शासनाने राज्यातील ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय २९ फेब्रुवारी घेतला होता.

त्यात चाळीसगाव तालुक्यातील ८४ हजार ४७१ शेतकऱ्यांना जवळपास १३३ कोटी १९ लाखांचे अनुदान मंजूर झाले असून ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा शुभारंभ आज माझ्याहस्ते करण्यात आला. येत्या ४८ तासात चाळीसगाव तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा होईल.

यावेळी तहसीलदार श्री. प्रशांत पाटील, नायब तहसीलदार श्री.जितेंद्र धनराळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास मदतीची मर्यादा २ हेक्टर वरून ३ हेक्टर केली आहे
तसेच प्रति हेक्टरी अनुदान देखील वाढविण्यात आले असून त्यात बहुवार्षिक पिके – २२५००/-  प्रति हेक्टर, बागायत – १७५००/- प्रति हेक्टर, कोरडवाहू – ८५००/- प्रति हेक्टर अश्या वाढीव दराने शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

चाळीसगाव तालुक्याला प्रथमच एकरकमी १०० कोटींच्या वर मदत मिळाली आहे. शासन निर्णय झाल्याच्या १५ दिवसांच्या आत सदर मदत वितरित केल्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो.

ऑगस्ट २०२१ मध्ये महापुरात घर जनावरे दुकाने जमीन खरडणे नुकसान झालेल्या महापूरग्रस्तांना ६ कोटी निधी मंजूर झाला आहे,

त्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या होत्या अश्या १९ गावातील ५६७ शेतकऱ्यांना 80 लाख निधीचे प्राप्त आहे. येत्या ८ दिवसांच्या आत त्यांची नुकसानभरपाई थेट बँक खात्यात जमा होईल.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात पुढील काळात चारा छावणी, पाणी टँकर, शैक्षणिक शुल्कमाफी, पीककर्ज पुनर्गठन यामाध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असेल.

ही भरघोस अशी मदत मंजूर केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे चाळीसगाव वासीयांच्या वतीने आभार मानतो..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button