महाराष्ट्र शासन,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग(बार्टी)पुणेच्या वतिने,सामाजिक न्याय पर्व,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जंयती उत्साहात
महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी),पुणेच्या समतादुत प्रकल्पाच्या वतिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जंयती उत्साहात साजरी करण्यात आली. ‘ सामाजिक न्याय पर्व ‘निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे आयोजन मा.प्रकाश अण्णाजी गाढवे(समतादुत),बार्टी,पुणे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. प्रा.डॉ. उत्तम शेंडे (बा.दे. पारवेकर कनिष्ठ महाविद्यालय, पारवा,ता.घाटंजी,जि.यवतमाळ त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्य शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. सामाजिक दृष्टया सर्वानी सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा.प्रकाश गाढवे (बार्टी ),पुणे त्यांनी ‘सामाजिक न्याय पर्वाची ‘ माहिती दिली. ‘शासकिय योजनांची जत्रा ‘ उपक्रम विषयी थोडक्यात माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा.विजय धों. जितकर(विधी सेवा समिती सदस्य,जेष्ठ समाजसेवक) शिवाजी ज्यु.कॉलेज,आकोट, जि. अकोला त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जंयतीच्या शुभेच्छा दिल्यात. तसेल शैक्षणिक आणि सामाजिक, विचार मांडले. सामाजिक न्याय पर्व ‘ अतिशय महत्वाचा उपक्रम असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.राहुल कऱ्हाळे (प्रकल्प अधिकारी)बार्टी ,पुणे यांनी केले. त्यांनी ‘सामाजिक न्याय पर्व ‘ च्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच समाज कल्याण व बार्टीच्या विविध योजनाची माहिती दिली. मान्यवरांचे आभार कु.मनिषा खंडाळकर(बार्टी),पुणे यानी मानले.कार्यक्रमाला नागरिक, युवक,युवती,शिक्षक,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हा अकोला से मोहम्मद जुनेद कीये रिपोर्ट