जागतिक योग दिन निमित्त इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्या वतीने महिलांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
जागतिक योग दिन निमित्त इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्या वतीने महिलांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रोजेक्ट चेअरमन आणि योग शिक्षिका जया सचदेव यांनी खुप सोप्या व वेगळ्या पद्धतीने योगासने,
प्राणायाम, ध्यानसाधना उत्तम प्रकारे क्लब मेंबर्स व महिला याना शिकवले.तसेच ४० बर्षा मधील महिलांना होणारे शरीरातील बदल ह्या विषयी माहिती व त्यावर कोणत्या प्रकारे योगा ने मात करता येते याची माहिती दिली. धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना तणाव व चिंता मुक्त आयुष्य ,
आत्मविश्वास ,समूह योगा कसा करायचा याचे मार्गदर्शन केले.ह्या साठी प्रोजेक्ट को चेअरमन मुस्कान तरलेजा ह्यांनी पण उत्तम सहकार्य केले. तसेच क्लब मधील मेंबर्स, इतर महिला वर्ग ह्या शिबीर मध्ये भाग घेतला. ह्या शिबिरा मध्ये प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर, सेक्रेटरी सारिका शाह, व्हाईस प्रेसिडेंट छाया पवार, श्रुती जोशी, अंजना माने, ट दिपाली लोहार, सारिका वेल्हाळ, निमिषा गौर , आशा सावंत, नंदा आवळकर, डॉ. शैलजा कुलकर्णी, शिवांजली पाटील, सुकेशनी कांबळे, अनिता शुक्ला,
अनिता सुतार यांची उपस्तीती होती.प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तवना केली. सेक्रेटरी सारिका शाह यांनी सर्वांचे आभार मानले. कराडहून मुख्य संवाद दाता पियुष गोर यांची रिपोर्ट