धारावी आगारातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर फुलाचा वर्षाव करून दिला शेवटचा निरोप,काल बेस्ट उपक्रमाच्या धारावी आगारात सेवानिवृत्त सत्कार समारंभ संपन्न झाला
धारावी आगारातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर फुलाचा वर्षाव करून दिला शेवटचा निरोप,काल बेस्ट उपक्रमाच्या धारावी आगारात सेवानिवृत्त सत्कार समारंभ संपन्न झाला,कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजन श्री,संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती,धारावी बॉईस मित्र मंडळं,सेवानिवृत्त संयुक्त उत्सव समिती धारावी आगार यांच्या संयुक्त विद्यमानाने धारावी आगारात करण्यात आले होते.जन सेवा हिच ईश्वरांची सेवा मा. श्री. सुरेश गोपाळ शिंदे साहेब काल बेस्ट उपक्रमाच्या सेवेतून वय नियतीने बेस्ट उपक्रमाच्या सेवेतून लेखनिक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सह धारावी आगारातील श्री. अंकुश चौधरी , शंकर रामाने, नारायण जाधव, गंगाधर शिरसाट इत्यादी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांचा
सेवानिवृत्तीचा कार्यक्रम धारावी आगारात आयोजित करण्यात आले होते.
सन्माननीय सत्कारमूर्ती ना साल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करण्यात आले. शिंदे साहेब यांना
3 ग्राम सोन्याची अंगठी संपूर्ण कपड्यांचे आहेर, सन्मान चिन्ह,साल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले. त्याप्रसंगी शिंदे साहेबांना आनंद अश्रू अनावर झाले.
कर्मचारी , अधिकाऱ्यांसोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या या सत्कार सोहळ्यास मोठ्या प्रमाणात कर्मचारी ,अधिकार वर्ग उपस्थित होता. अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात तून त्यांच्या कार्य ,कर्तुत्व, काम करण्याची शैलीचा उपस्थितांना जाणीव करून दिली. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्व कर्मचारी, अधिकारी, समाज बांधवांच्या वतीने सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा रूपी आशीर्वाद देण्यात आले.
अतिशय भावुक,आनंदमय वातावरणात सत्कार सोहळा संपन्न झाला. सूत्रसंचालनाची जबाबदारी दिनेश पुरी तर आभार व कार्यक्रमाची सांगता श्री. आप्पा मर्ढेकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली..त्याप्रसंगी श्री.अविनाश जाधव, (बदलापूर शहर तालुकाध्यक्ष भा.बं.स.क.से.) मा. रमेश राठोड (अध्यक्ष सेवालाल ज.उ.स).,दीपक कदम, रविद्र कदम, देवेंद्र चव्हाण, कांबळे, हेमंत भोईर, विकास विचारे , देवेंद्र कोळी, प्रवीण उबाळे, पांडुरंग गुरव, संतोष,दीपक भिलारे , यांच्या सह धारावी आगारातीलच नव्हे तर इतर आगारातून मोठ्या संख्येने कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते….
अविस्मरणीय सत्कार सोहळा पार पडला.
शब्दांकन:-
नितीन रमेश जाधव