कावड बंदोबस्त सबंधी मा. श्री बच्चन सिंह पोलीस अधिक्षक, साहेब अकोला, यांची भेट

अकोला महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद

दि. ०५/०८/२०२४ रोजी दुपारी १४/०० वाजता सुमारास मा. श्री बच्चन सिंह पोलीस अधिक्षक, अकोला, यांनी पोलीस स्टेशन दहिहांडा अंतर्गत ग्राम गांधीग्राम येथे भेट दिली त्यावेळी मा. श्री अनमोल मित्तल सहायक पोलीस अधीक्षक अकोट, आणि पुरुषोत्तम ठाकरे ठाणेदार पो. स्टे. दहिहांडा हे हजर होते. मा. पोलीस अधिक्षक साहेब अकोला यांनी कावड पालकी उत्सवाचे अनुषंगाने गांधीग्रामी येथील पुर्णा नदीचे पात्राचे परीसराची बंदोबस्ताचे दृष्टीने पाहणी केली तसेच मा. पोलीस अधिक्षक साहेब अकोला यांनी शिव भक्त व स्थानिक नागरीकांना कावड पालकी उत्सव शातंतेत पार पाडण्या करीता तसेच उत्सवा दरम्यान पोलीसांनी दिलेल्या सुचनाचे अंमलबजावणी करण्या करीता आवाहन केले व सदर चा बंदोबस्त शांतता व सुव्यवस्थेत पारपाडण्या सबंधी आवश्यक सुचना दिल्या।

Related Articles

Back to top button