चाळीसगावात अडीच लाखांचा प्रतिबंधीत तंबाखूचा साठा जप्त,अन्न सुरक्षा विभागासह चाळीसगाव शहर पोलिसांची संयुक्त कारवाई तिघांविरोधात गुन्हा

Banned tobacco stock worth 2.5 lakhs seized in Chalisgaon, joint action of Chalisgaon city police with food security department, criminal case against three.

आबा सूर्यवंशी

(जळगाव जिल्हा प्रतिनिधी)- चाळीसगाव शहर पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाने चाळीसगाव शहरातील तीन गोदामांमध्ये छापेमारी करीत प्रतिबंधीत गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. ही कारवाई मंगळवार,१८ रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ दरम्यान करण्यात आलीचाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली तीन गोदामांमध्ये छापेमारी चाळीसगाव शहर पोलीस व अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मे. सोनल सुपारी सेंटर, सपना स्वीट्स व बजाज स्वीट्स सेंटर येथे छापा टाकून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि स्वादिष्ट सुपारीचा दोन लाख ५७ हजार ५५८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला या प्रकरणी संजय मैकुलाल केशरवाणी (४३) चाळीसगाव किशन मुरलीधर नागदेव सिंधी कॉलनी चाळीसगाव व संजय घनशामदास बजाज सिंधी कॉलनी, चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत.

Related Articles

Back to top button