फार्मासिस्ट डे उत्साहात साजरा,पथ नाट्या द्वारे केली जनजागृती

 

पारे: विटा येथिल आदर्श कॉलेज ऑफ फार्मेसी च्या 18 विध्यार्थ्यांनी 25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट डॉ चे औचित्तसाधून पारे या गावी फार्मासिस्ट चे महत्व या विषयावर पथनाट्याचे आयोजन केले होते .ग्रामपंचायत पारे येथे कुमार .करण सोलनकर यांनी जागतिक फार्मासिस्ट दिना चे महत्व सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली .त्यानंतर प्रा.स्वाती पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांनचे स्वागत केले . साळुंखे श्रेया ,जाधव भक्ती ,माळी वसुधा , सूर्यवंशी अनुराधा , सूर्यवंशी सानिका ,पाटील शुभम ,सोलनकर करण , जाधव साहिल , पाटील साक्षी , पाटील वैष्णवी , जमदाडे स्नेहल , पवार अनुष्का ,साठे प्रेरणा , शिंदे श्रुती , सूर्यवंशी सानिका , कदम अंकिता यांनी फार्मासिस्ट चे महत्व या विषयावर पथनाट्या सादर करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला .त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट युअर हेल्थ विषयावर ग्रामपंचायत ते बस स्टॅण्ड पर्यंत रॅली काढली, तसेच मेडिकल व्हिजिट व पेशंट कौन्सलिंग सर्व्हे केला . यासाठी आदर्श कॉलेज ऑफ
फार्मसी चे प्राचार्य डॉ निरंजन महाजन यांचे मार्गदर्शन लाभले ,तसेच सरपंच सुवर्णा पांढरे , ग्रामसेवक खरमाटे आर. टी यांचे परवानगी दिल्याबद्दल विद्यार्थ्यानी विशेष आभार मानले .तसेच ग्रामसदयस् धनाजी तेली ,वाघमोडे साहेब ,पांढरे साहेब इत्यादी यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे यशश्वी आयोजन प्रा.स्वाती पाटील यांच्या नेतृवाखाली व डॉ. निरंजन महाजन ( प्राचार्य) यांच्या मार्गदर्शना द्वारे पार पाडले .
सदाशिवराव ( भाऊ ) पाटील ,अँड. वैभव(दादा)पाटील , पी .टी पाटील (कार्यकारी संचालक ), प्रा. पूजा पाटील (कॅम्पस संचालक) यांनी केलेल्या यशश्वी कार्यक्रमा बद्दल अभिनंदन केले . खराडहून पियुष गोर यांची रिपोर्ट

Related Articles

Back to top button