इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्याकडून महिला महोत्सव साजरा
कराड-पियुष गोर
कराड येथे वेणूताई चव्हाण हॉलमध्ये आज इनरव्हील क्लब ऑफ संगम कराड यांच्याकडून खूप मोठ्या उत्साहात महिला महोत्सव साजरा करण्यात आला त्यामध्ये पाककला स्पर्धा मेंढी स्पर्धा गो ग्रीन मॅरेथॉन रील तसेच फॅशन शो आणि नऊ वधू मेकअप कॉम्पिटिशन याप्रकारे सर्व स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या या सर्व प्रोग्रामचे मुख्यता कराडचे शिवशंकर ज्वेलर्स हे प्रायोजक होते व त्यांना सहप्रायोजक श्री खाकरा स्टुडिओ नाईन्टीन व जिजाऊ महिला गृह उद्योग यांनी सहकार्य केले आणि यावेळी या चौरस स्पर्धांमध्ये खूप मोठ्या प्रमाणे बक्षीसे वाटप केले गेले बक्षीसामध्ये सुद्धा फक्त एक नंबर दोन नंबर तीन नंबर नाही तर उत्तेजनार्थ सुद्धा देण्यात आले यावेळी या क्लबचे प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले सेक्रेटरी सारीका शहा यांनी या क्लब बद्दल थोडीशी माहिती दिली व्हॉइस प्रेसिडेंट व आपले मनोगत व्यक्त केले तसेच व्हॉइस प्रेसिडेंट छाया पवार यांनी सूत्रसंचालन केले . इनरव्हील क्लब ऑफ संगम कराड यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत करून हा प्रोग्राम फार चांगल्या रीतीने पार पडला सर्व महिला स्पर्धकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता व या कार्यक्रमाची शोभा वाढवली नववधू मेकअप मध्ये कोल्हापूरच्या धनश्री पाटील ला पहिला क्रमांकाचे बक्षीस लागले खूपच सुंदर मेकअप त्यांनी केला होता मैथाली खुस्पे यांना दोन नंबरचे नववधू कॉम्पिटिशन व डान्स कॉम्पिटिशन मध्ये एक नंबरचे बक्षीस मिळाले पल्लवी शिंदे यांना बेस्ट मेकअप आर्टिस्ट चे बक्षीस मिळाले