ऍड .भाई भाऊसाहेब देसाई यांच्या स्मृती दिनानिमित्त कराड कोर्ट येथे सर्व रोग निदान शिबिर
कराड विद्या मोरे
कराड बार असोसिएशन, सह्याद्री हॉस्पिटल कराड व के एन गुजर मेमोरियल हॉस्पिटल कराड, यांच्या संयुक्त विद्यमाने कराड कोर्टामध्ये सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .यामध्ये सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या तसेच दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, हृदयरोग चिकित्सा, इसीजी व अन्य चिकित्सा असा सर्व सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 300 हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कराड बारचे अध्यक्ष ऍड ,एम. टी. देसाई हे होते, या शिबिरास सर्व न्यायाधीश वकील वर्ग ,कोर्ट कर्मचारी तसेच पक्षकार यांनी भेटी दिल्या, याप्रसंगी ऍड .एस .एन. चिंगळे ,ऍड. राम होगले ,ऍड. पी. एच. चव्हाण यांनी भाऊसाहेब देसाई यांच्या स्मृतीस उजाळा दिला. या शिबिराला भेट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी भेट दिली. यावेळी बाबा म्हणाले की, भाऊसाहेब देसाई यांनी आयुष्यभर कोणाचीही पिळवणूक न करता लोकांची वकिली केली, तसेच अत्यंत प्रामाणिकपणे समाजकारण व राजकारण केले . ते त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले ऍड समीर देसाई हे ही वडिलांचा वारसा जपत आहेत, असे याप्रसंगी त्यांनी प्रतिपादन केले. उपाध्यक्ष ऍड दिवटे ,सचिव ऍड. साईप्रसाद पाटील, ऍड .सी .बी. कदम, ऍड. पि. के. घाडगे हेही उपस्थित होते .ऍड भाई समीर देसाई सातारा जिल्हाध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष यांनी आभार मानले.