अकोला:महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना रक्तदानाने अभिवादन
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील फुले, शाहू, आंबेडकर शिक्षण प्रसारक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराच्या सुरुवातीला भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.रक्तदान शिबीरात श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.गजानन पुंडकर,प्रा.राजेंद्र पुंडकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे,प्रहारचे जिल्हाध्यक्ष कुलदिप वसू,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धिरज हिंगणकर, जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ निचळ,सरपंच दिगंबर पिंप्राळे,पंचायत समिती सदस्य सुरज गणभोज,उपसरपंच निलेश झाडे,माजी सरपंच मुकुंद निचळ,मोहाळा सोसायटीचे अध्यक्ष रहेमत पटेल,आकोलखेड सोसायटीचे अध्यक्ष दादाराव तायडे, पोलीस पाटील अमरनाथ शेगोकार,माजी सरपंच केशव लांडे,प्रा.अमर वासनिक,राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष शारदा थोटे,ग्रा.पं.सदस्या प्रमिला अशोक सिरसाट,मिनाक्षी गोपाल बोचे,पार्वती शंकर पदमणे,ग्रा.पं.सदस्य घनश्याम बिजणे,अ.जहिद अ.शहिद, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल जवंजाळ,बजरंग तळोकार,शे.जब्बार शे.आबू,वामनराव तोताडे, प्रविण तायडे,खलील सौदागर, ज्येष्ठ पत्रकार पंजाबराव काळे,मुकुंद आप्पा तेल्हारकर,सदानंद सिरसाट,कैलास थोटे,डॉ.प्रभाकर नगराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष ललित नगराळे यांनी केले.रक्त संकलन करण्यासाठी स्त्री रुग्णालय अकोला येथील डॉ.कुंदन चव्हाण,श्रीकांत थोरात,अनुप टाले,गोपाल इंगळे,पवन महल्ले,रुपेश पाटील यांनी रक्त संकलन केले.तसेच आकोलखेड चे वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद पारस्कर, डॉ.सोहेल,प्रविण चापके यांनीसुद्धा सेवा दिली.रक्तदान शिबीरात प्रविण तायडे,सुरज गणभोज,करुणेश मोहोड,केशव लांडे,सुजित सिरसाट,अविनाश धुवे,राहुल जयस्वाल,कुलदिप वसू,उमेश खैरे,अमर वावरे,अक्षय बागडे आदींनी रक्तदान केले.फुले,शाहु, आंबेडकर शिक्षण प्रसारक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेचे योगेश काळे, प्रमोद नगराळे,भारत सिरसाट,अमोल किटके,राहूल मोहोड,रतन खैरे,विजय पाटील,प्रदिप सिरसाट,संघर्ष मुनेश्वर,सुमित नगराळे,प्रसाद पुडके,युवराज यादवार, आदित्य नगराळे,सुहास किटके,रोहित नगराळे,गौरव वंडकार,चेतन पाटील,अब्दूल सोफीयान,आदर्श काळे यांच्यासह पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.