Badlapur news:गर्भवती महिलांची नावे नोंद करून घेत नाही तसेच त्यांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरू असल्या बाबत
बदलापुर महाराष्ट्र से जीतू पाटोले की रिपोर्ट
Badlapur:गर्भवती महिलांची नावे नोंद करून घेत नाही तसेच त्यांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरू असल्या बाबत.उल्हासनगर शहरात प्रसिद्ध असलेल्या शासकीय प्रसुतिगृह व दवाखाना उल्हासनगर ४ येथे गर्भवती महिलांची नावे नोंद करून त्यांची पुढील तपासणी तसेच औषधं दिली जातात.
परंतु काही महिन्या पासून या प्रसुतीगृह येथील कर्मचारी तसेच डॉक्टर गर्भवती महिला यांचे नाव नोंद करून घेत नाही ,महिला दवाखान्यात आल्या नंतर त्यांना तुमचे नाव पुढील महिन्यात नोंद करून घेऊ असे सांगून घरी परत जाण्यास सांगत आहेत.तसेच जेव्हा जेव्हा त्या दवाखान्यात येतात त्यांच्या कडे आधार कार्ड तसेच अजून काही कागदपत्रे झेरॉक्स करुन आणण्यास सांगत आहे.एका वेळेस ५ कीव १० झेरॉक्स प्रती घेऊन येण्यास सांगितले जाते.तसेच पुन्हा दुसऱ्या महिन्यात आल्या नंतर त्यांना पुन्हा झेरॉक्स घेऊन याण्यास सांगितले जात आहे.
महिला गर्भवती असताना ही त्यांना बाहेर जाऊन झेरॉक्स घेऊन आणून देत आहे.कर्मचारी कडून गर्भवती महिलांचे मानसिक त्रास देण्याचे काम सुरू आहे.तसेच नावं नोंद करून घेत नसल्याने गोरगरीब महिलांना खाजगी रुग्णालयात आपले नाव नोंद करावे लागत आहे.
आज दिनांक १४ऑगस्ट रोजी प्रसुती गृह येथे काही डॉ यंचासी भेट घेण्यास गेलो असता अधिकारी पेशंट तपासण्यात व्यस्त असल्या कारणाने भेट झाली नसून काही डॉक्टर्स ना भेटून या बाबत ची चर्चा केली त्यांनी झेरॉक्स बाबत एकच वेळेस जे कागदपत्र पाहिजेल ते सांगीतले जातील व वारंवार त्यांच्या कडून कागदपत्राची मागणी केली जाणार नाही असे उत्तर दिले व नावं नोंद करता ही लक्ष देण्यात येईल असे आश्वासन दिले.
ॲड प्रशांत भानुदास चंदनशिव