Akola news:पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी करा – मुख्यमंञ्याना उपविभागीय अधिकारी मार्फत,आकोट तालुका पत्रकार संघाचे निवेदन
रिपोर्ट:महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
आकोट: राज्यात पत्रकारांवरील वाढते हल्ले तसेच पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत होणारी कुचराई पहाता अखिल भारतीय मराठी परिषद मुंबई संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघ अंतर्गत आकोट तालुका पत्रकार संघाने आकोट चे उपविभागीय अधिकारी यांना १७ ऑगस्ट रोजी निवेदन दिले.तसेच पत्रकार संदिप महाजन यांना झालेली शिवीगाळ व मारहाण घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
निवेदनानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकारांवर हल्ले वाढत आहेत. त्यामध्ये पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. त्याच्या निषेधार्थ राज्यातील पत्रकारांच्या ११ प्रमुख संघटनांशी जोडले गेलेले सर्व पत्रकार आज दि १७ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन केले. पत्रकार संदिप महाजन यांना सत्ताधारी आमदाराने अश्लिल शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या समर्थकांनी त्यांना भर चौकात बेदम मारहाण केली. या बाबतची तक्रार महाजन यांनी पोलिस स्टेशनला दिली. तरी सुध्दा मारहाण करणा-यांविरूध्द पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. या घटनेचा आकोट तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध केला. तसेच पत्रकार संदिप महाजन यांना मारहाण करणाऱ्यांविरूध्द पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच राज्यात पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देतेवेळी जिल्हा पत्रकार संघाचे सचिव विजय शिंदे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिओम व्यास, कार्याध्यक्ष कमलकिशोर भगत, सचिव मंगेश लोणकर, रामदास काळे,किर्तीकुमार वर्मा कुंजीलाल कोठारी, दिपक देव,हरिदास चेडे,वसिम खान किरण भडंग,रमेश तेलगोटे, वामन जकाते,संतोष विणके,रविंद्र उर्फ लकी इंगळे यांची उपस्थिती होती.