कराड:पी एम किसान सन्मान व नमो किसान सन्मान योजनापासून वंचित लाभार्थी यांच्यासाठी कराड तालुक्यातील प्रत्येक गावोगावी शिबिरे लावावी : सुदर्शन पाटसकर
कराड: पी एम किसान सन्मान व नमो किसान सन्मान योजनापासून
वंचित लाभार्थी यांच्यासाठी कराड तालुक्यातील प्रत्येक गावोगावी शिबिरे लावावी : सुदर्शन पाटसकर पर एम किसान सन्मान तसेच नमो किसान सन्मान योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी गावोगावी शिबिर आयोजित करावीत याचे निवेदन कराड तहसीलदार श्री विजय पवार यांना देताना भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर,कराड शहर अध्यक्ष विशाल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.भूमी अभिलेख नोद, केवायसी, आधार बँक खात्याशी सलग्न नसल्याने अनेक शेतकरी आहेत. गावोगावी शिबिरे आयोजित करून लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या अटींची पूर्तता करावी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या १४ व्या हप्त्याचे वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. राज्यातील ९७ लाखांपैकी १२ लाख शेतकरी कागदपत्रे आणि अटींची पूर्तता नसल्याने १४ व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कराड तालुक्यातील अनेक शेतकरी यांना १ किंवा २ च हप्त्याचे लाभ मिळाले आहेत. अनेक वेळा कागदपत्र देऊन ही त्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे.तरी भूमी अभिलेख नोंद अद्ययावत नसणे, ई-केवायसी नसणे, बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न नसणे या अटी अपूर्ण असल्याचे दिसत आहे. या सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान तसेच नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व अटींची त्वरित पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदार, कृषी अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी आणि संबंधितांची संनियंत्रण समिती गठित करण्यात यावी. या समितीच्या देखरेखीखाली गावपातळीवर कृषिसेवक, तलाठी, ग्रामसेवक यांनी शेतकऱ्याकडून अटींची पूर्तता करून घेण्यासाठी कराड तालुका व शहर भागात शिबिरे घेऊन एकही पात्र शेतकरी या योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे,पात्र शेतकन्यांना न्याय देणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे,
रिपोर्ट:श्रीमती विद्या मोरे की रिपोर्ट