महेश डोंगरे यांचा महाकाल बैल शर्यतीत अव्वल… अनेक बक्षीसांचा ठरला मानकरी….
रिपोर्ट:राहुल शांताराम दाहोत्रे
वाई – बैल म्हटलं की फक्त काम करून राब राब राबणे अशी प्रतिमा समोर येते आणि वर्षात एकदा पोळ्याच्या दिवशी सजावट आणि चांगले खाणे एवढेच चित्र समोर येते मात्र याला अपवाद ठरला सातारा जिल्ह्यातील वाई येथील शेतकरी महेश (काका) डोंगरे यांचा महाकाल बैल या बैलाने आतापर्यंत शर्यतीत अनेक विक्रम केले जवळपास ३० ते ३५ शर्यती जिंकून नामांकित बैलगाड्याना मागे टाकून महाकाल बैल नेहमी गुलालात असतो.
महेश डोंगरे हे महाकाल वर जीवापाड प्रेम करतात घराच्या सदस्यांप्रमाने त्याला जिव लावतात महाकाल बैलाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पुढे जावून महाकाल ने कायम हिंद केसरी किताब जिंकला पाहिजे अशी इच्छा त्यांची आहे.