वसुबारस चे औचित्य साधून गौशाळेमध्ये पारंपारिक पद्धतीने पूजा
कराड – पियुष गोर.
आज पासून दिवाळी सणाची सुरुवात वसुबारस पासून आपला पारंपारिक हिंदू सणाची दिवाळी पर्वाची सुरुवात होते याचे औचित्य साधून आज भाजी मंडई कराड येथील गौशाळे मध्ये सार्या लोकांनी येऊन गाईचे पूजन वगैरे केले त्यांना चारा वगैरे खायला दिला व सर्व लोकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच गायीची मनापासून पूजा व अर्चना केली त्यांना तिलक करणे चारा चारणे त्यांच्या पाया पडणे त्यांची पूजा करणे त्यांची आरती करणे व आपल्या जुन्या परंपराला अनुसरून दीपावली पर्वाची सुरुवात केली त्यावेळी गौशाळेचे सुनील पावसकर ज्योती दंडवते पियुष गोर,मदन सावंत, अनिल कडणे अनिल खुंटाळे राजेश चांडक गीता सूर्यवंशी व इतर गोसेवक उपस्थित होते.