अजितअप्पा चिखलीकर यांच्या महिलांबाबत केलेल्या” त्या’ वक्तव्याचा आ पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून निषेध
Prithviraj Chavan's condemnation of Ajitappa Chikhlikar's "condemnation" statement regarding women
कराड: विद्या मोरे
बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल विखे पाटील स्टेजवर असताना खालच्या पातळीवर टीका होते महिलांबद्दलच्या अशा वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे आ पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले…. पत्रकारांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी आ चव्हाण यांनी आज संगम हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते… त्यानिमित्त ते बोलत होते…याच त्यांच्या बोलण्याचा धागा पकडत…कराडात काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार चव्हाण समर्थक अजित अप्पा चिखलीकर यांनी देखील महिलांबद्दल जे वक्तव्य केले होते त्याचा भाजप महिला आघाडी कडून निषेध व्यक्त करून अजित अप्पा चिखलीकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी झाली होती… तुम्ही जसे बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबाबत झालेल्या विधानाचा निषेध करत आहात…तसा अजित अप्पा चिखलीकर यांच्या वक्तव्याचा निषेध करता का…आ चव्हाण यांना विचारला तेव्हा आ चव्हाण यांनी चिखलीकर यांच्या वकव्याचा जाहीर निषेध करतो असे सांगितले..
आ चव्हाण समर्थक अजित अप्पा चिखलीकर यांनी कोग्रेसच्या मेळाव्यात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्यानंतर महिलांबद्दलच्या या वक्तव्याबाबत चर्चेचे मोठे वादळ उठले होते… अनेक संतापजनक प्रतिक्रिया येत होत्या…त्याबद्दल भाजप महिला आघाडी ने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देखील केली होती… त्यावर काँग्रेसकडून मात्र कोणताही निषेध व्यक्त करण्यात आला नव्हता… मात्र आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर देताना आ पृथ्वीराज चव्हाण यांनी अजितअपा चिखलीकर यांच्या वकव्याचा जाहीर निषेध नोंदवला…