महाराष्ट्र कर्ज मुक्त अभियान साठी सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष विनोद चव्हाण यांचे उपमुख्यमंत्री अजित पावर यांना निवेदन
पुणे – महाराष्ट्र कर्ज मुक्त अभियान करण्याकरता सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष विनोद भाऊ चव्हाण यांनी दि 25 रोजी vvip क्रिकेट हाऊस विधान भवन पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन निवेदन दिले.दिनांक 25 ऑगस्ट 2023 वेळ सायंकाळी 6 वाजता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे क्रिकेट हाऊस येथे आगमन झाले. त्यावेळी वडगाव मतदार संघाचे आमदार सुनील भाऊ टिंगरे व सहकार अध्यक्ष काँग्रेसचे दीपक मानकर आमदार चेतन तुपे हडपसर, माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते, यावेळेस गरिबांसाठी भारत कर्जमुक्ती साठी तळमळणारे सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष विनोद भाऊ चव्हाण व त्यांचे कार्यकर्ते आशा चौधरी , प्रीती जोशी , सुमित गायकवाड , हर्षल जावळे यांच्या हस्ते निवेदन पत्र देण्यात आले ह्यात सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी गरीब लोकांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली. निवेदन पत्र दिल्यावर सम्राट अशोक सेना अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मुलाखत रिपोर्टर प्रीती जोशी यांच्या वतीने घेण्यात आली.