अमरावती:राज्यात ऐतीहासिक शिक्षक भरती, अचलपूर पलिका प्रशासान मात्र शिक्षक भरती बाबत उदासीन

अचलपुर संवाददाता सैयद गनी की विशेष रिपोर्ट
अचलपुर अमरावती महाराष्ट्र,
महाराष्ट्र राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भर्तीची प्रक्रिया सुरू आहे. सदर भर्ती राबविण्यासाठी फेब्रुवारी 2023 मध्ये अभियोग्यता परीक्षा सुद्धा घेण्यात आलेली होती. सदर शिक्षक भरती करिता नोव्हेंबर 2022 ची पटसंख्या गृहीत धरण्यात येत आहे. व या पट संख्येनुसार बिंदूनामावली तयार करण्यास सरकार कडून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेशित करण्यात आले होते. अचलपूर नगरपालिके च्या शाळांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्वच माध्यमाची पदे रिक्त आहेत व ही सर्व पदे भरण्यात यावी म्हणून दिनांक 28/07/2023 रोजीच शहरातील अभियोग्यता धारकांनी मुख्याधिकारी अचलपूर यांना निवेदन दिले होते. परंतु आज पाच महिने उलटूनही नगर परिषदेची संचमान्यता व बिंदूनामावली त्रुटी मध्ये आहे असे पालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडून कळत आहे. या सर्व त्रुटी दूर करून लवकरात लवकर रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर देण्यात यावी म्हणून आज पुन्हा शहरातील अभियोग्यता धारकांकडून अचलपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन देताना प्रा. शैख अफसर, मो असलम, जुबैर शाह, इरफान खान, सुमिय्या परवीन, नगमा परवीन, प्रा. शाहना परवीन आदी अभियोग्यता धारक उपस्थित होते.

निवेदना मध्ये पुढील संदर्भ देण्यात आले आहेत –
१) शासन निर्णय क्र. सीईटी 2015/प्र. क्र.149/टीएनटी-1 दि.07/02/2019
2) शासन निर्णय क्र. संकीर्ण.2022/प्र. क्र.106/टीएन टि-1 दि.10/11/2022
3) शासन निर्णय क्र. संकीर्ण – 2023/प्र. क्र.509/टीएनटी -2 दि. 13/10/2023
4) संचलानालय प्र. क्र. शिसं/जाहिरात – पदभर्ती/पवित्र पोर्टल टेट -4/5491 दि. 27/10/23

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button