Akola news:शिक्षक दिनी फ्रीडम शाळेने केले शिक्षकांना सन्मानित

रिपोर्ट:मोहम्मद जुनैद
अकोट- स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीडम इंग्लिश हायस्कूल अकोट मध्ये 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली वर्ग पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर भाषणे दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज झाडे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व काय असते आपण शिक्षक दिन का साजरा करतो यावर प्रकाश टाकला तसेच सर्व शिक्षकांनी सुद्धा शिक्षक दिना चे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले .शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा टाले यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प व पेन देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे संचालन तनुश्री रंधे प्रास्ताविक दिशा बोडखे आभार प्रदर्शन आस्था कैसर यांनी केल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


