Akola news:अकोट -दि 5/9/2023 महाराष्ट्रामध्ये नव्याने दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले यामध्ये सर्वात मोलाचा वाटा म्हणजे दिव्यांग हृदय सम्राट वंदनीय नामदार बच्चुभाऊ कडू अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग माजी मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा पातळीवर शासन दिव्यांगांच्या द्वारी हे अभियान सुरू आहे त्या अनुषंगाने

[responsivevoice_button rate="1" pitch="1.0" volume="0.9" voice="Hindi Female" buttontext="Listen This News"]

महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद

अकोट तहसील कार्यालय येथे माननीय तहसीलदार चव्हाण साहेब यांच्या आणि अप्पर तहसीलदार विनायक सावडे सर मार्गदर्शनाखाली सभा घेण्यात आली सभेला प्रमुख प्रहार दिव्यांग क्रांती संस्था अकोट कार्यकारिणी प्रमुख तथा तालुकाध्यक्ष श्याम दादा साबळे यांनी हजेरी लावली आणि तालुक्यामध्ये असलेल्या दिव्यांगांच्या समस्या त्याच्याबद्दल तहसीलदार चव्हाण सर अप्पर तहसीलदार विनायक सावडे यांच्या सोबत चर्चा झाली त्यामध्ये संजय गांधी निराधार पेन्शन हे रेगुलर मिळण्यासाठी उपायोजना पेंटिंग असलेल्या केसेस यावरील तोडगा दिव्यांगांना सरसकट अंतोदय मध्ये समाविष्ट करण्यासाठी उपलब्ध असलेला कोठा याबद्दल चर्चा करण्यात आली दिव्यांगांना विनाअट घरकुल योजना ग्रामीण भागामध्ये राबविण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली यावेळी अकोट तहसीलचे गट विकास अधिकारी नागे साहेब, नायब तहसीलदार अत्राम साहेब हे देखील सभेला हजर होते तसेच अकोट ग्रामीण रुग्णालयाचे महिला अधिकारी पोलीस निरीक्षक अधिकारी विस्तार अधिकारी रुद्रकार साहेब उपस्थित होते तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अकोट तालुका कार्यकारिणी प्रमुख तथा तालुका अध्यक्ष श्याम दादा साबळे, अकोट तालुका सचिव दिनेश भाऊ जवुळकार महिला अध्यक्ष उमा खंडार आणि बहुसंख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते येत्या तीन ऑक्टोबरला शासन दिव्यांगाच्या द्वारी हे अभियान जिल्हा पातळीवर अकोला या ठिकाणी होणार आहे यामध्ये दिव्यांगांचे सर्वच काम एका छताखाली होणार आहेत तरी तालुक्यातील दिव्यांगांनी आपले पेंटिंग असलेली कामे जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना समाज कल्याण मधील योजना याचा लाभ घ्यायचा आहे आणि बहुसंख्येने अकोला येथे उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार चव्हाण साहेब यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button