Akola news:मानव समाजाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी अभिवादन

रिपोर्ट:मोहम्मद जुनेद

अकोला जिले के अकोट मे विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानव समाजाच्या वतीने अकोट रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून महिलांचा यथोचित सत्कार सुद्धा करण्यात आला. यावेळी संघटनेचे सचिव विजय जितकर यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला मानव समाज संघटनेचे सचिव विजय जितकर, सदस्य लोककलावंत भिकाजी भारती यांच्यासह महिला, पुरुष, लहान मुले उपस्थित होते त्यावेळी पेढे वाटून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मानव समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश भाई सेजपाल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button