Akola news:पोलिस पाटलांचे प्रश्न तत्परतेने मार्गी लाऊ,जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे अकोला
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
श्री.शिवाजी महाविद्यालय आकोट येथे नुकताच महसूल व गृह विभागाच्या संयुक्त विद्यमाने विभागीय पोलिस पाटील मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव हे होते.अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी उद्घाटन केले.छ.शिवाजी महाराज,महात्मा गांधीजी,शि.म.डाॅ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.पोळा,गणेशोत्सव,दुर्गादेवी,ईद इत्यादी सणोत्सव तसेच पुढील काळात होणाऱ्या निवडणूका ह्या शांतता व सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठीची महसूल व गृह विभागाची भुमिका व जबाबदारीच्या सविस्तर माहितीचा आढावा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी उद्घाटनपर भाषणातून विशद केला.तसेच अॅड गजानन पुंडकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकातून केलेल्या विनंतीला उत्तर देताना सांगितले की,’पोलिस पाटलांना वारसाचे दाखले देताना काही अडचणी येतात.अकोला जिल्ह्यातील अनेक गावात दहा ते अकरा वर्षापासून पोलिस पाटील यांची पदे रिक्त आहेत.शासनाकडे पाठपुरावा करूनही ही पदे भरण्यात आली नाहीत.अनेक ठिकाणी एकाच पोलिस पाटलावर तिन ते चार गावांचा पदभार आहे.त्यामुळे इतर गावातील नागरिकांना दाखले मिळण्यासाठी विलंब व ञास होतो,ही समस्या व इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण तत्परतेने प्रयत्न करू,असे आश्वासन संदीप घुगे यांनी उद्घाटकीय भाषण प्रसंगी दिले.मेळाव्याचे अध्यक्ष,उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांनीही मौलिक मार्गदर्शन केले.मेळाव्याला सहायक पोलिस अधीक्षक अभय डोंगरे,एस.डी.पी.ओ.श्रीमती रितू खोखर,तहसीलदार डाॅ.सुनील चव्हाण आकोट शहर पो.नि.तपन कोल्हे,ग्रामीण पो.नि.संजय खंदाडे,दहिहांडा पो.नि.सेवानंद वानखडे,हिवरखेड पो.नि.गोविंद पांडव,प्राचार्य डॉ.सुनील पांडे यांची उपस्थिती होती.