Mumbai news:इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम कडुन बस स्टॉप चे अनावरण
मुंबई:इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम कडुन बस स्टॉप चे अनावरण,इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम कडुन इनरव्हील सामाजिक उपक्रमा अंतर्गत विद्यानगर येथील शालेय व महाविद्यालया च्या विदयार्थी साठी बस थांब्या ची उभारणी करण्यात आली.त्याचे
उद्धघाटन माननीय डिस्ट्रिक्ट चेअरमन रचनाजी मालपाणी , एस. जी. एम. कॉलेज चे प्राचार्य श्री. मोहन राजमानेसर,सैदापूर चे सरपंच मा. फतेसिंह जाधव,उपसरपंच श्री.अनिल जाधव , श्री.हर्षद देसाई ,ग्रामपंचायत सदस्य श्री.सुरेश हजारे,कुमार देसाई,रोटरी क्लब कराड चे प्रेसिडेंट बद्रीनाथ धस्के ,सेक्रेटरी शिवराज माने,रो.रघुनाथ डूबल,रो.किरण जाधव,कालिका देवी पतसंस्था चेअरमन बाळासाहेब मोहिरे,संचालक राजन वेळापुरे,श्री.जीवन पवार सर यांच्या उपस्थितीत पार पडला.
रचना मालपाणी यांनी या उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. आणि इनर व्हील क्लबचे समाज उपयोगी काम अगदी उत्तम रित्या सुरू आहे असा उल्लेख आपल्या भाषणात केला. तसेच प्रेसिडेंट तरूणा मोहिरे व सेक्रेटरी छाया पवार व सर्व क्लब सदस्य यांचे अभिनंदन करून पुढील उपक्रमास शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य राजमाने सर यांनी आपल्या मनोगतात इनर व्हील क्लब कराड संगम चे आभार मानले की बस स्टॉप विदयार्थ्यांसाठी अत्यंत गरजेची गोष्ट होती आणि ती क्लब ने पूर्ण केली.
प्रेसिडेंट तरुणा मोहिरे यांनी सर्वांचे स्वागत आणि सत्कार केला.सेक्रटरी छाया पवार यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.या उपक्रमासाठी एस. जी. एम. कॉलेज आणि सैदापुर ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले. डि सी रचनाजी यांच्या हस्ते क्लब मेंबर नंदा आवळकर याना व्यवसाया साठी क्लब कडून शिलाई मशीन देण्यात आली. यावेळी मोहिनी धस्के क्लब सदस्य दीपाली लोहार,सुषमा तिवारी,अनिता शुक्ला,अलका शिंदे,अश्विनी भंडारी, अपूर्व पाटणकर, श्रुती जोशी,अंजना माने,सारिका शहा,विद्या पावसकर,वृषाली पाटणकर,डॉ.शैलजा कुलकर्णी ,नंदा आवळकर, प्राजक्ता देसाई,विजयश्री मोहिते,संगीता पाटील इ .उपस्थित होते. कराड होऊन पियुष गोर यांची छोटीशी रिपोर्ट