डॉक्टर द. शि एरम मुकबधीर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्त बक्षीस वितरण समारंभ
कराड- पीयूष गोर. .
डॉक्टर द शी एरम अपंग सहाय्य संस्थेचे मूकबधिर विद्यालयात व वस्तीगृह सैदापूर कराड येथे जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये भरघोस यश संपादन करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला यामध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रज्ञा चव्हाण यांनी केले व प्रास्ताविकेचे सादरीकरण विद्यालयाचे प्राचार्य श्री विजय घाडगे सर यांनी केले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विद्यालयाच्या उपाध्यक्ष माननीय सौ जयश्री गुरव मॅडम आणि कराड अर्बन बँकेच्या ज्येष्ठ संचालिका व आधारस्तंभ माननीय सौ रश्मी एरम मॅडम आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ पालांडे यांचे स्वागत व सत्कार घेण्यात आला यानंतर माननीय सौ जयश्री गुरव मॅडम व सौ रश्मी एरम मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून कौतुक सोहळा पार पडण्यात आला संस्थेच्या उपाध्यक्ष जयश्री गुरव मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे शिक्षण घेऊन समाजामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे व सोबतच सर्वसामान्य लोकांप्रमाणे चांगले व उत्तम आयुष्य जगून समाजात योग्य असा ठसा उमटावा अशाप्रकारे संस्थेच्या उपाध्यक्ष सौ जयश्री गुरव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला आभाराचे गोड काम श्री सस्ते सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.