दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला
Disabled Week was celebrated
कराड -पीयुश गोर
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम तर्फे दिव्यांग सप्ताह निमित्त द. सी. एरम अपंग सहाय्य संस्थेच्या मूकबधिर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. जो मूकबधिर शाळेत घेण्यात आला इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या वतीने डॉक्टर शैलजा कुलकर्णी मॅडम यांनी तिथे मुलींना गुड टच व बॅड टच याच्यावरती माहिती दिली. त्या मुलींना त्यांच्याच मूकबधिर भाषेमध्ये समजून सांगण्यासाठी शाळेतील सीमा कारंजे मॅडम यांनी सहाय्य केले. मुलींनी आपले स्व.संरक्षण कसे करायचे हे कुलकर्णी मॅडमनी प्रात्यक्षिक करून दाखवले. मुलींना हे सर्व समजले का असे विचारले व मुलीकडून प्रात्यक्षिक करून घेतले.डॉ. शैलाजा मॅडम यांनी आरोग्यविषयक पण माहिती दिली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विजय घाडगे सर यांनी खूप छान उपक्रम शाळेला दिला याबद्दल क्लबचे आभार मानले . यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर ,सेक्रेटरी सारिका शहा, एडिटर निमिषा गोर, डॉ.शैलजा कुलकर्णी आणि सुकेशनी कांबळे या उपस्थित होत्या. शाळेतील सीमा कारंजे मॅडम, तेजस्विनी मॅडम ,मीना मॅडम, संगीता मॅडम आणि सर्व स्टाफ उपस्थित होता.