Akola news:शाळा महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयात केली स्वखर्चाने फवारणी ,शेखर बेंडवाल मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम

मोहम्मद जुनैद महाराष्ट्र अकोट

आकोट
शाळा महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयात तसेच खुल्या जागे लगत प्रहार जनशक्ती पक्षा चे युवक आघाडी तालुका कार्याध्यक्ष शेखर बेंडवाल यांनी स्वखर्चाने फवारणी केली .
अकोट शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छर व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दवाखान्यांमध्ये डेंगूचे, ताप, सर्दी, खोकला यांच्या रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच असून यामध्ये आता डेंगू, मलेरिया सारखे आजार डोके वर काढत आहे. शहरांमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढिगार खुल्या प्लॉट मध्ये साचलेले पाणी यामुळेच अस्वच्छता पसरली असल्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे लहान मुलांन पासून ते वयोवृद्धांपर्यंत यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. हि बाब प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष शेखर बेंडवाल यांच्या लक्षात आल्याने त्यांनी स्वतः सर्व शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालय परिसरात तसेच लोक वस्तीमध्ये खुल्या जागांवर फवारणी करून एक सामाजिक उपक्रम राबविला.
अकोट शहर हे गजबजलेले लोकवस्तीचे शहर असल्याने या शहरांमध्ये विविध ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाराने अस्वच्छता पसरलेली आहे. या अस्वच्छतेमुळे तसेच खाली प्लॉट मध्ये साचलेल्या पाण्यामध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
वाढत्या मच्छरांमुळे साथीच्या आजाराने दवाखाने हाउसफुल झाले आहे. नगरपालिका व आरोग्य विभागाकडून या गंभीर बाबींसह नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूक नसल्यानेच प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष शेखर बेडवाल यांच्या मित्र परिवाराने स्वखर्चाने प्रभागांमध्ये तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय परिसरसह लोकवस्तीमध्ये जाऊन फवारणी केली. डासांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्यामुळे अनेक लहान मुले ते वयोवृद्धांपर्यंत या सर्वांना दवाखान्यात दिसत आहेत. अशातच त्यांनी सर्व शाळा महाविद्यालय लोकवस्तीमध्ये जाऊन स्वतः स्वखर्चाने त्यांनी फवारणी केली. हा सामाजिक उपक्रम प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु, युवक जिल्हाध्यक्ष सुशील फुंडकर, तालुकाध्यक्ष गणेश गावंडे, संदीप मर्दाने यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला . यावेळी गणेश आवारे, कुणाल पवार, सौरभ जायले, निर्भय बैरीवाल, शुभम गवई, दिप लोणकर, सागर तायडे, करण मुरकर, क्रिष्णा काकड यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट………
बेंडवाल यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे शहरात नगरपालिका आणि आरोग्य विभाग करतो तरी काय? प्रशासनास आपल्या जबाबदारीची जाण करून देण्यास चांगलीच चपराक या निमिताने बसली असल्याचे बोलल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button