एस. एस. एम. एम.महाविद्यालयात राष्ट्रिय गणित दिन उत्साहात साजरा!

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – पाचोरा तालुका सह.शिक्षण संस्था संचलित एस.एस.एम.एम. महाविद्यालय येथे २२ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रिय गणित दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. महान भारतीय गणितज्ञ ‘श्रीनिवास रामानुजन’ यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात सररामानुजन यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखवण्यात आला. या माहितीपटातून विद्यार्थ्यांना रामानुजन यांच्या अद्वितीय गणितीय कौशल्याची आणि त्यांनी केलेल्या संशोधनाची माहिती आणि त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे. व्ही.पाटील अध्यक्ष स्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून IQAC समन्वयक प्रा. डॉ. शरद पाटील , प्रा. डॉ. के.एस. इंगळे, प्रा. डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. डॉ. माणिक पाटील होते. अध्यक्षीय भाषणात डॉ.जे.व्ही. पाटील यांनी रामानुजन यांच्या योगदानाबद्दल मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना गणित क्षेत्रात नवनवीन कल्पना आणि संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.अतुल पाटील, प्रा अमित गायकवाड, प्रा.स्वप्नील पाटील, प्रा.सुवर्णा पाटील, प्रा.डॉ.प्राजक्ता शितोळे, प्रा.डॉ. सरोज अग्रवाल, प्रा. जयश्री वाघ, प्रा. लक्ष्मी गलानी, प्रा. संजिदा शेख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. मेघा गायकवाड यांनी केले. गणित दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम अत्यंत यशस्वी केल्या बद्दल कौतुक करण्यात आले.


