एम एम महाविद्यालयात एन.ई. पी. २०२० – स्कुल कनेक्ट २.५ कार्यशाळा संपन्न
आबा सूर्यवंशी
जळगांव जिल्हा प्रतिनिधी:
पाचोरा – महाराष्ट्र शासन व कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच श्री शेठ मुलींधारजी मानसिंगका कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्कुल कनेक्ट २.५ अंतर्गत
दि. १० जानेवारी रोजी श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका कनिष्ठ महाविद्यालय येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्कूल कनेक्ट २.५ अभियानास प्रारंभ झाला. पाचोरा येथील कनिष्ठ महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे कार्यक्रम अध्यक्ष मा. उपप्राचार्य प्रो. डॉ. वासुदेव वले होते. त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणात होणारे बदल सर्वांना माहीत व्हावे यासाठी मार्गदर्शन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य जी. बी. पाटील पर्यवेक्षक एस.एस. पाटील तसेच प्रमुख मार्गदर्शन प्रा. डॉ. जे.पी. बडगुजर यांनी केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. योगेश पुरी यांनी केले . पी पी टी प्रेझेंटेशन प्रा. अतुल पाटील यांनी केले तर प्रा. डॉ अतुल सूर्यवंशी यानी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण २०२० समजावून सांगितलं.या कार्यक्रमाचे आभार प्रा डॉ.एस. बी. तडवी यांनी मानले तसेच प्रा आर. बी. वळवी, प्रा. डॉ. शरद पाटील प्रा. स्वप्नील भोसले व इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी , अकरावी व बारावी चे विद्यार्थी उपस्थित होते.